
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर :- गीतकार दिनेश मंडाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेले “ती आली नाही” हे प्रबोधनपर गाणे माझ्या हस्ते जिल्हा परिषद लेखाधिकारी श्री रत्नराजजी जवळगेकर यांच्या उपस्थितीत आज सोशल साईटवर प्रदर्शित करण्यात आले. सिनेमाची कथा रंजक करण्यासाठी त्यातील गाणी उत्तम भूमिका बजावत असतात हेच तत्व वापरत लसीकरणाविषयी समाजात प्रबोधन करण्यासाठी “ती आली नाही” गाणे साकारण्यात आले आहे.
या गीतामध्ये कोरोनाची लस घेण किती महत्त्वाचं आहे याबाबत जनजागृती केली आहे. गायक दिनेश मंडाळे, पोर्णिमा पाटील, एडिटिंग माळी ब्रॅण्ड, डी शार्प स्टुडिओ यांचा सहभाग आहे. सर्वांच्या मनाचा वेध घेत लसीकरणाबद्दल चे संभ्रम दूर करण्यासाठी हे गाणे यशस्वी ठरो, हिच सदिच्छा