
दैनिक चालू वार्ता
आटपाडी तालुका
प्रतिनिधी दादासो वाक्षे
आटपाडी ग्रामपंचायत क्षितिज महिला ग्रामसंघ व माणदेशी फाउंडेशन मार्फत महिला आरोग्य शिबिर वार्ड नंबर ५ ऐवळे गल्ली येथे घेण्यात आले यावेळी तज्ञ प्रशिक्षकांमार्फत उपस्थित महिलांना योग प्रशिक्षण धडे देऊन आरोग्य संतुलित व सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी औषध गोळ्यांचे वितरण मोफत करण्यात आले. महिलांमध्ये रक्तक्षय, बीपी, शुगर, सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या तक्रारी प्राधान्याने आढळून आल्या त्यामुळे या आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या योगांची प्रात्याक्षिके दाखवून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण केली. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी गांभीर्याने घेऊन निरोगी जीवन जगावे, अशा प्रकारचे आवाहन आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी यावेळी केलें