
दै चालु वार्ता वृत्तसेवा
जव्हार:- जव्हार आणि मोखाड्या सारख्या ग्रामीण व आदिवासी भागात काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या संस्थेचा पहिला वर्धापनदिन श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट या शाळेत प्रमुख अतिथी पत्रकार जितेंद्र मोरघा यांच्या उपस्थितीत पार पडला.संस्थेच्या पहिल्या वर्षपूर्ती सोहळ्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या अनेक लोकपयोगी उपक्रमांची माहिती देऊन संस्थेचे अध्यक्ष मुकेश वातास यांनी वर्षभराचा लेखाजोखा मांडून सखोल माहिती दिली.या वेळी बोलतांना अध्यक्षांनी संस्था भविष्यातही ग्रामीण भागात लोकपयोगी उपक्रम राबवून काम करेल असे सूतोवाच केले.या वर्धापनदिनी कार्यक्रमात शाळेतील मुलींना प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवून मासिक पाळी बद्दल ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या सदस्या कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर सर्व किशोरवयीन मुलींचे मानसिक समाधान झाल्याचे दिसून आले. प्रत्येक मुलीने आपल्याला येणाऱ्या अडचणी व शंका मांडल्या आणि मार्गदर्शन करीत असताना सदस्यांनी सर्व मुलींच्या शंकाचे निरसन केल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.कार्यक्रमात बोलतांना शाळेच्या मुख्यध्यापकांनी संस्था करीत असलेल्या कामाचे कौतुक करून संस्थेला भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.युवा सामर्थ्य प्रतिष्ठान कडून शाळेतील मुलांना खाऊचे व मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले.
या वर्धापनदिनी प्रसंगी युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश वातास,पत्रकार मनोज कामडी,जितेंद्र मोरघा,शाळेचे मुख्याध्यापक मराड सर आणि सहशिक्षक,मुले-मुली तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते तसेच संस्थेच्या पहिल्यावर्षपूर्ती सोहळ्यात सूत्रसंचालन भोये सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष दिपक काकरा यांनी केले.