दैनिक चालू वार्ता
पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
आदिवासींसाठी शेकडो योजना, असंख्या रुग्णवाहिका. मात्र हे सगळे चर्चेत व बातम्यांतच दिसते.

प्रत्यक्षात जिवंतपणी यातना भोगणाऱ्या आदिवासींची मृत्यूनंतरही सुविधांअभावी परवडच होते. नेते, राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिकांची गर्दी असलेल्या येथील जिल्हा रुग्णालयात बाळांतपणादरम्यान मृत्यू झालेल्या आदिवासी माय-लेकराच्या मृतदेहाला शववाहिका न मिळाल्याने बारा तास प्रतिक्षा करावी लागली.
या माय-लेकराच्या कलेवरासोबत डोळ्यातील आसवं थीजवत त्याच्या कुटुंबियांना रात्रभर धावाधाव करूनही काहीच हाती लागले नाही. शासकीय कर्मचारी व अन्य कोणालाही त्यांची कणव आली नाही. याच भागात असंख्य राजकीय पक्ष, नेत्यांनी रुग्णवाहिका उभ्या ठेवल्या आहेत. मात्र कोणीही पैसे नसल्याने त्यांच्या मदतीला आला नाही.
अखेर(ता.२४) दुपारी एकच्या सुमारास एका रुग्णवाहिकेतून त्यामाय लेकरांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. येथील रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या दुर्गम आदिवासी पाड्यासाठी आधार आहे. शनिवारी (ता.२३) रेखा पोटींदे ही महिला जव्हारला प्रसूतीसाठी दाखल झाली. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तीला नाशिकला हलविण्यात आले. मध्यरात्री नाशिकच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान तीचे व अर्भकाचे निधन झाले. महिला व अर्भकाचा मृतदेह जव्हारला नेण्यासाठी तीचे कुटुंबीय सरकारी शववाहिकेची वाट पहात राहिले. त्यांना शववाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल बारा तासाच्या प्रतिक्षेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यानी यंत्रणेशी संर्पक साधला. मात्र शववाहिका अखेरपर्यत मिळालीच नाही. शेवटी एका रुग्णवाहिकेतून हे दोन्ही शव दुपारी जव्हारला रवाना करण्यात आले.
शववाहिकेच्या प्रतिक्षेत आदिवासी माय लेकराच्या मृतदेहाची १२ तास परवड!
आदिवासींसाठी शेकडो योजना, असंख्या रुग्णवाहिका. मात्र हे सगळे चर्चेत व बातम्यांतच दिसते.
आदिवासींसाठी शेकडो योजना, असंख्या रुग्णवाहिका. मात्र हे सगळे चर्चेत व बातम्यांतच दिसते. प्रत्यक्षात जिवंतपणी यातना भोगणाऱ्या आदिवासींची मृत्यूनंतरही सुविधांअभावी परवडच होते. नेते, राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिकांची गर्दी असलेल्या येथील जिल्हा रुग्णालयात बाळांतपणादरम्यान मृत्यू झालेल्या आदिवासी माय-लेकराच्या मृतदेहाला शववाहिका न मिळाल्याने बारा तास प्रतिक्षा करावी लागली.
या माय-लेकराच्या कलेवरासोबत डोळ्यातील आसवं थीजवत त्याच्या कुटुंबियांना रात्रभर धावाधाव करूनही काहीच हाती लागले नाही. शासकीय कर्मचारी व अन्य कोणालाही त्यांची कणव आली नाही. याच भागात असंख्य राजकीय पक्ष, नेत्यांनी रुग्णवाहिका उभ्या ठेवल्या आहेत. मात्र कोणीही पैसे नसल्याने त्यांच्या मदतीला आला नाही.
अखेर(ता.२४) दुपारी एकच्या सुमारास एका रुग्णवाहिकेतून त्यामाय लेकरांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. येथील रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या दुर्गम आदिवासी पाड्यासाठी आधार आहे. शनिवारी (ता.२३) रेखा पोटींदे ही महिला जव्हारला प्रसूतीसाठी दाखल झाली. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तीला नाशिकला हलविण्यात आले. मध्यरात्री नाशिकच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान तीचे व अर्भकाचे निधन झाले. महिला व अर्भकाचा मृतदेह जव्हारला नेण्यासाठी तीचे कुटुंबीय सरकारी शववाहिकेची वाट पहात राहिले. त्यांना शववाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल बारा तासाच्या प्रतिक्षेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यानी यंत्रणेशी संर्पक साधला. मात्र शववाहिका अखेरपर्यत मिळालीच नाही. शेवटी एका रुग्णवाहिकेतून हे दोन्ही शव दुपारी जव्हारला रवाना करण्यात आले.
आर्थिक विवंचना हेच कारण
जव्हार मोखाडा भागातील आदिवासी कुटुंबांना नाशिकला रुग्णालयात आणण्यापासून रोजच रुग्णवाहिका व शववाहिकांची प्रतिक्षा करावी लागते. शासनाने जिल्हा रुग्णालयाला तीसेक नवीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी व स्टाफ तीचा वापर स्वतः घरी ये जा करण्यासाठी करतात, अशी तक्रार आहे. या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन कोण बघते? यांसह अनेक गंभीर प्रश्न या घटनेने उपस्थित झाले आहेत. त्याला कोणी राजकीय नेते पुढे येऊन वाचा फोडेल का? याची विचारणा होत आहे.