दै चालु वार्ता
प्रेस नोट
दैनिक चालू वार्ता
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
श्रीकांत पवार
महाराष्ट्रभर निघणारी लखीमपुर खेरी किसान शहीद अस्थिकलश यात्रा 30 ऑक्टो रोजी कवठेमहांकाळ मध्ये..
उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील या अत्यंत काळयाकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या ६३१ शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किसान शहीद अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा शनिवार दि. 30 ऑक्टो रोजी सांगलीत येत आहे. स्टेशन चौक येथे सकाळी 10 वा. अभिवादन सभा होईल. व पुढे तासगाव तालुक्यात जाईल. तेथून मनेराजूरी मार्गे
आपल्या……
कवठेमहांकाळ तालुक्यात आगमन होणार आहे
*शिरढोण येथे सायंकाळी 4 वा. ग्रामपंचायत पटांगणात* अभिवादन करण्यात येणार असून पुढे
*कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर सायंकाळी 5 वा. अभिवादन सभा होणार आहे.*
तरी कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व समविचारी पक्ष संघटना यांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या शेतकरी भावाच्या अस्थीना अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे…
शाहिदोंके अरमानोंको मंझील तक पहुचाऐंगे…….
*लाठी गोली खाऐंगे फिर भी आगे जाऐंगे…
किसान एकता जिंदाबाद
*शहीद किसान अमर रहे*
आपलेच.
संयुक्त किसान मोर्चा. कॉंग्रेस (आय) पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. शिवसेना. प्रहार. स्वाभिमानी शेतकरी संघटना. बळीराजा पार्टी.
सर्व कामगार संघटना. विद्यार्थी संघटना युवक संघटना. सर्व समविचारी पक्ष. संघटना. अखिल भारतीय किसान सभा.