
दैनिक चालु वार्ता , शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर विचिञ अपघात घडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक दिल्याची घटना घडली.या अपघातात 3-4 जणांचा जागीच मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर विचिञ अपघात घडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक दिल्याची घटना घडली. मध्यप्रदेश सेंधवाकडून शिरपूर अडे येत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यात तिन ते चार चार चाकी वाहनांचा तर काही ट्रकांचा समावेश आहे. भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांना एकमेकावर धडकल्याने भीषण अपघात घडला आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग अॅम्ब्युलन्स आरोग्य कर्मचारी पोलीस व नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे अजूनही अपघातात जखमींची संख्या समजू शकले नाही वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात 3-4 जणांचा जागीच मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती आहे.