
दैनिक चालू वार्ता
नांदेड प्रतिनिधी (विश्वास खांडेकर)
सोबतच्या छायाचित्रात जो खड्डा दिसत आहे तो कुठल्या आदिवासी पाड्यावरील पुलावर नसून तो खड्डा आहे नांदेड शहरातील मध्यभागी असणाऱ्या नाव घाट पुलावरचा, हा पूल म्हणजे नांदेड आणि सिडको शहराला जोडणारा एक मुख्य पूल आहे.
नांदेड आणि सिडको शहराच्या अगदी मधोमध गोदावरी नदी वाहते आणि या नदीवर जवळजवळ पाच ते सहा मोठे पूल आहेत त्यापैकी जुना पुल, नवीन पुल, नाव घाट पुल, आणि राम सेतू हे 4 अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी नाव घाट पुलाचे दुसरे नाव म्हनजे आत आपघात पूल म्हणावे लागेल .
नांदेड येथील जुना होळी भाग आणि आणि सिडको शहर, दूध डेरी यांना जोडणारा हा मुख्य पुल आहे. परंतु या पुलाची अवस्था अगदीच दयनीय झाली आहे हा पुल इतर पुलांपेक्षा उंचीने अगदीच छोटा आहे. त्यामुळे नदीला थोडे देखील पाणी आले की हा पूल पाण्याखाली गेलाच म्हणून समजा, एवढे असून देखील गेल्या अनेक महिन्यापासून या पुलाला भगदाडा सारखा फार मोठा खड्डा अगदी मधोमध पडला आहे आणि प्रशासनाने फक्त बॅरिकेट लावून त्याला सोडून दिले आहे .सकाळच्या वेळी अनेक दूधवाले कामाला निघालेले अगदी या पुलावरून सहज जात असतात, हा खड्डा अशा ठिकाणी पडला आहे की, रस्ता उंच आणि पूल खाली अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. मला तर वाटते जगातील पहिलीच बांधकाम शैली असेल की ज्या ठिकाणी पुलावर जाण्याकरता चढाव नाही,उतरावं लागतं त्याच्यानंतर पुल पार केल्यानंतर परत शहरात प्रवेश करण्यासाठी गाडी चढवुन न्यावी लागते, यामुळे सकाळच्या वेळी अंधुक प्रकाश असताना हा खड्डा दिसून येत नाही, अनेक लोक त्या खड्यावर आदळतात खड्ड्याची खोली अडीच ते तीन फूट आहे ,लांबी रुंदी उंची जर घेतली तर सात आठ फुटाचा नक्कीच होईल त्यातच दोन दिवसा आधी या पुलावर फार मोठा अपघात घडला आहे .दोन चाकी गाड्या समोरासमोर एकमेकावर आदळल्या यात दूध देणाऱ्या माणसाचा पाय तुटला आहे. आणि त्याला इस्पितळात दाखल केले आहे.
नांदेड शहराची कमाल म्हणजे महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत हा पूल आहे आणि याकडे प्रशासनाची डोळेझाक पणा करीत आहे. या पुलाची दुसरी अवस्था म्हणजे रात्रीच्या वेळी हा पूल रोड रोमीयोनी भरलेला आपल्याला दिसून येईल ,संध्याकाळी पाच ते जवळजवळ रात्री दहा अकरा पर्यंत येथे मोबाईल धारकांचा मेळावा भरलेला आपल्याला दिसून येईल यामुळे जाणारे येणारे नागरिक देखील हैराण आहेत.
ही आवस्था नुसती नाव घाट पुलाची नसून, नवीन पुल, जुना पुल ,रामसेतू या सर्व पुलांवर देखील हीच अवस्था आहे. याशिवाय रिंग रोडवर असणारा पूल तर खड्ड्यानी भरून गेला आहे .
अनेक अपघात घडत आहेत अपघातात लोकांना मार देखील लागत आहे प्रशासनाला त्याचे काही घेणे देणे नाही. त्यानी कमीतकमी आपल्या शहरा कडे मंत्रिपद आहे याचे तरी भान ठेवावे. लोक हैराण झाले आहेत कोणाला विचारावे !जीव जाणाऱ्या जात आहे लोकांना मार लागत आहे एखाद-दोन दिवस लोक हळहळ करतात परंतु पर्यायी मार्ग नसल्याने परत याच पुलाचा वापर करावा लागतो. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर या पुलांची अवस्था अजूनच बेकार होण्याची शक्यता आहे.