दैनिक चालु वार्ता / कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड –
कंधार : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय गेवराई तांडा, औरंगाबाद यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत श्री धनेश्वरी कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थी शेतकऱ्यांना शेती विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करत आहेत.
या प्रसंगी कृषिदुत सदानंद मारोती सोनटक्के यांनी जांब (खुर्द) या गावातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, कृषी रसायने फवारणी करताना घ्यावयाची काळजी, आधुनिक शेतीविषयक मोबाईल ॲप वापराबाबत चे सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये एकात्मिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम होता
यावेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ. ए. व्ही. वैद्य सर, भालकर सर, कार्यक्रम सम्वयक प्रा. कल्पेश शेलार सर, प्रा. विजय मुंगिलवार, प्रा.कुलकर्णी, प्रा. दिग्रसकर, प्रा. साठे, प्रा. सोनवणे, प्रा. राखेलकर, युवाराज्य मुखेड तालुका प्रतिनिधी किरण गोंड ,प्रा. वाघ, प्रा.जाधव आणि इतर विषय तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रयोगशील शेतकरी दत्ता कर्णे (माजी सरपंच), माधव होनराव (सरपंच), शिवाजी गोंड, रामदास गोंड, रामेश्वर होनराव,बालाजी होनराव, शिवकुमार होनराव व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. हे सर्व कार्यक्रम कृषीदुत सदानंद सोनटक्के प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.