
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी -माधव गोटमवाड
कंधार मिशन कवच-कुंडल अंतर्गत सरकार विविध माध्यमातून जनजागृती करत लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने वाटचाल करत आहे त्यातीलच एक अविभाज्य घटक आरोग्य उपकेंद्र कळका या केंद्राच्या माध्यमातून 100% लसीकरण करण्याच्यादृष्टीने अठरा वर्षाच्या वरील सर्वांना लसीकरण मिळावे याकरिता
आरोग्य उपकेंद्र कळका अंतर्गत सर्व गावांत जनजागृती करून नागरिकांचे झालेले गैरसमज व भविष्यात कोणत्या ही योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आरोग्य उपकेंद्र कळका या प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासन काळजी घेत आहे त्याकरिता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.आरोग्य उपकेंद्र कळका पुढील प्रमाणे लसीकरण मोहीम पहिला डोस व दुसरा डोस.कळका लोकसंख्या १३२०, लसीकरण ११९९ ,कळकावाडी ४१० -२३६ ,नावंदेवाडी ९२० -५३२ ,बोरी ४१०-१६०,बोरी (बू)८५०-४००,कागणेवाडी३२०-१४८,देवायचीवाडी१०५०-६३३,चुडाजीचीवाडी २०६-७३एकूण लोकसंख्या 5486 पैकी 3381 एवढ्या लोकांनी लसीकरण घेतलेल आहे उर्वरित लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्व गावातील सर्वांनी सहकार्य करावे या कामी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री लक्ष्मिकांत पेटकर व सहाय्यक परिचारिका नर्स एस.डी. पूजलवाड.व कळका येथील आशावर्कर शोभाताई पांचाळ हे सर्व शंभर टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मेहनत घेत आहेत.