
दै चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
कंधार पासून २ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या बहादरपुरा हे ग्रामपंचायतीचे गाव आहे. पण तालुक्यामध्ये राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. सदरील गावांमधून अगदी जवळच मन्याड नदी ही पूर्णतः भरून वाहत आहे. सदरील बहादरपुरा या गावातून नांदेड बिदर हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. यामुळे या गावातील भरपूर प्रमाणात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.तसेच नांदेड लातूर कडून जाणारी वाहने ही जास्त प्रमाणात रस्ता चांगला झाल्यामुळे बहादरपुरा या मार्गावरून दिवस-रात्र जात आहेत. सहाजिकच ही वाहने सदरील बहादरपुरा फुलावरून वाहतूक होत आहे. पण सदरील फुल हा खूप कमकुवत झाला आहे.
सदरील पुलावरून मुखेड , जाब, जळकोट, दिग्रस ,उदगीर बिदर तसेच शिरूर ,लातूर व उदगीर कडून येणारी नांदेड कडे खूप प्रमाणात वाहतूक होत आहे. सदरील फुल हा कमकुवत झाला असून या पुलावर खूप प्रमाणात जड वाहने सुद्धा ट्रक ,ट्रॅक्टर ,वगैरे यांची सुद्धा वाहतूक होत आहे.
सदरील पुलाला खूप प्रमाणात खड्डे असून कठडे सुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी ही काठोकाठ भरली आहे. सदरील नदी भरलेली व कठडे तुटलेले रात्री जर या पुलावर लाईट नसेल तर काय अवस्था होईल तरी हा विचार न केलेला बरा? संबंधित प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून हा पूल कमकुवत झाला आहे. एक तर नवीन पूल बांधावा किंवा तात्पुरता या पुलाला डागडुजी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.