
दै .चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार आरोग्य सेवा क्षेत्राच्या उत्तम भविष्यासाठी सुगम्यता, किफायतशीर, उत्तरदायी, अनुकूल आणि जागरूकतेसाठी सरकार वचनबद्ध आहे : केंद्रीय आरोग्य मंत्री
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या आशिया आरोग्य 2021 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. ‘उत्तम भविष्यासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन ’ ही शिखर परिषदेची संकल्पना आहे.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच आरोग्य भारतातील विकासाशी जोडले गेले आहे. ते म्हणाले की, पूर्वी आरोग्य म्हणजे केवळ उपचार होते, मात्र आता विकासाला आरोग्याशी जोडल्यामुळे देशात आरोग्य आणि समृद्धी येईल.
आरोग्य सेवा क्षेत्राच्या उत्तम भविष्यासाठी सुगम्यता , किफायतशीरता , उत्तरदायी , अनुकूल आणि जागरूकतेप्रती सरकार वचनबद्ध आहे आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे, असे त्यांनी नमूद केले. आरोग्य सेवा सुलभ आणि परवडणारी बनवण्यासाठी सरकारने आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना), आयुष्मान आरोग्य आणि निरामयता केंद्रे, जेनरिक औषधांसाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP), आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) आणि पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान यांसारख्या विविध योजना सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सरकार ‘प्रतीकात्मक बाबींपासून संपूर्ण आरोग्याकडे’ या संकल्पनेवर भर देत आहे. 25 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान , हा या संदर्भातला आणखी एक उपक्रम आहे.
तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांना जोडण्याची गरज अधोरेखित करताना केंद्रीय मंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रात नॅनो आणि रोबोटिक तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.
जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-19 महामारी दरम्यान पंतप्रधानांनी जन जागृतीसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये कोविडविषयीची योग्य माहिती पोचली .
खाजगी क्षेत्राला भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य पर्यटनाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे.
या कार्यक्रमाला नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद के पॉल, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा आणि भारतीय उद्योग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.