
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवू जिल्ह्यातील खरी पांच या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या चार लाख पूर्ण सूचनांचा सर्वे झाला त्यानंतर विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाईसाठी 458 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला आहे अशी खात्रीशीर बातमी सूत्रांकडून मिळाली आहे यात जवळपास सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली नुकसानीच्या प्रमाणात असेल दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होईल अशी शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली खरिपातील पिकासह बागायती तसेच फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत कृषी महसूल व ग्रामीण विकास यंत्रणा द्वारे केलेल्या सर्वेत किल्ल्यातील ाडेआठ लाख शेतकऱ्यांच्या सहा लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला कळवला होता याबाबत शासनाकडून भरपाईसाठी 576 कोटी ची मागणी करण्यात आली या सोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासना तर्फे पहिला पूर्वसूचना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या त्यांचे सर्वे मागील महिन्यापासून सुरू होते या सर्वे चे काम झाल्यानंतर कंपनी स्तरावर नुकसानीबाबत कार्यवाही सुरू होती राज्य शासनाचा हिस्सा मिळाल्यानंतर मंगळवारी केंद्रशासन ही विमा कंपनीकडे आपला हिस्सा जमा केला त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कार्यरत इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना 458 कोटी रुपयांचा विमा मंजूर केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली यात सर्व सोयाबीन उत्पादकाचा समावेश असल्याची माहिती मिळाली हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची खात्रीशीर सूत्राकडून मिळाली.