
दैनिक चालू वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा चौफुली येथे पोलिस उपमहानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, संजय मोहिते, पोलिस अधीक्षक पालघर दत्तात्रय शिंदे व पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमे-याचे उद्घाटन उत्साहात व कोवीड नियमांचे पालन करून करण्यात आले आहे.यावेळी त्यांच्या समवेत पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश गवई पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे,मंगेश मुंढे उपस्थित होते.पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून व पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सतीश गवई यांनी मोखाड्यातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी मंडळी यांना सीसीटीव्ही सहायता निधी देण्याचं आवाहन केलं.या आवाहनाला मोखाड्यातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी मंडळींनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीसीटीव्ही सहायता निधी जमा केला. त्या माध्यमातून मोखाडा चौफुली व मोखाडा शहर येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहे.यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसणार असून गुन्ह्याची उकल होण्यास मदत होणार आहे.गुन्हेगारांना सावधान असाच संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडून झाला आहे.पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी विशेष मेहनत या उपक्रमासा़ठी घेतली. लोकोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.