
देवपूर भागातील मुख्य रस्ते आणि कॉलन्यांमध्ये रस्ते तयार करण्यासाठी आमदार फारूक शाह यांची वाडीभोकर रोड परिसरासह देवपुरात विविध भागात पाहणी..!
दैनिक चालु वार्ता
धुळे जिल्हा प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे
शहरातील देवपूर भागात अमृत योजने अंतर्गत भुयारी गटारीचे काम करण्यात आले असून त्यात संपूर्ण देवपूर भागातील सर्वच रस्ते खोदकाम करून अपूर्ण सोडले आहे. यामुळे देवपूर भागतील नागरिकांना याचा खूपच जास्त त्रास सहन करावा लागत असून यासाठी धुळे शहरात रोजच आंदोलन होत आहे. भुयारी गटारींच्या कामांमुळे जवळ जवळ ३५० कॉलन्या व नगरे प्रभावित झाल्या असून अपघाताचे प्रमाण दररोजच झालेले आहे. तरी धुळे शहरातील देवपूर भागातील कॉलन्यांमध्ये रस्ते तयार करण्यासाठी आमदार फारूक शाह सातत्याने पाठपुरावा करत आहेत. देवपूर भागातील सर्वच रस्ते खोदकाम करून अपूर्ण सोडले असल्याची निवेदने धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे काही सामाजिक संघटना, ज्येष्ठ पत्रकारांनी आणि शहरातील नागरिकांनी दिलेली होती. यामुळे निवेदनांची दखल घेत आज आमदार शाह यांनी वाडीभोकर रोड, जयहिंद कॉलनीसह जवळ असलेल्या कॉलनी भागात पाहणी केली. पाहणी करत असतांना काम करण्यासंदर्भात आता दिरंगाई नको काम दोन दिवसात सुरु करून लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे अश्या सक्त स्वरूपाच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या समवेत सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्या वर्षा घुगरी, उपविभागीय अभियंता एजाज शाह, मजिप्रचे दिपक कुलकर्णी, रावसाहेब धोत्रे, धुळे महानगरपालिकेचे प्रदीप डी. चव्हाण, नगरसेवक नासिर पठाण, दीपश्री नाईक, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते