
दै चालु वार्ता
सोलापूर : खासदार संभाजीराजे म्हणाले की, आम्ही मूक आंदोलन केलं, शांतपणे चर्चा केली पण तुम्हाला काही फरक पडत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत. यापुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आता भेटणार नाही, आमचे समन्वयकही भेटणार नाहीत. मराठा आरक्षणावरुन भाजप खासदार संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.सोलापुरात संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा होती.त्यावेळी संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. तर, महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही त्यांनी सुनावलंय. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमच्या इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.