
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : एएनआय वृत्तसंस्थेनुसार, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की “पंतप्रधान मोदींच्या रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर जाणार आहेत. जिथे ते १६ व्या जी-२० शिखर परिषद आणि सीओपी-२६ च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोममध्ये असतील, जिथे ते जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. जी-२० शिखर परिषद साथीच्या रोगातून पुनर्प्राप्ती, जागतिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे, आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदल, शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षा यावर आहे.” नरेंद्र मोदी रोम आणि ग्लासगोला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान रोममध्ये असतील.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील. मात्र, ही चर्चा शिष्टमंडळ पातळीवर होणार की एकट्याने होणार हे अद्याप ठरलेले नाही,असे हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले.