
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनिधि नवनाथ यादव
भूम:- सविस्तर वृत्त असे की ,एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने भूम आगारा समोर बेमुदत उपोषण चालू झाले.दि २८ रोजी बस आगार च्या समोर सकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात झाली. कामगारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात करण्यात यावे , डीए वाढीची घोषणा केलीली असून , त्यामध्ये आजुनही वाढ केलीली नाही असे संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे,राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे,वाढीव घरभाडे देण्यात यावे,सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रथम उचल बारा हजार पाचशे रुपये देण्यात यावी,दिवाळीचा बोनस पंधरा हजार रुपये देण्यात यावा,वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के यावी.आश्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती भूम च्या वतीने भूम बस आगार समोर बेमुदत उपोषण चालू केले आहे.या उपोषणाला चंद्रमणी गायकवाड ऑल इंडीया पँथर मराठवाडा कार्याध्यक्ष,आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांनी जाहीर पाठिंबा दिला.सदरील अंदोलनाला सर्व परीने मदत करण्यात येईल असे अश्वासन दिले.
याप्रसंगी धनंजय माळी,विजयकुमार जाधवर, रविंद्र बोराडे, वाघोजी रनबावले, तानाजी मोटे, दत्ता कळबंड, बालाजी पवार,जोतीराम पखाले, डी एस शिंदे, पांडुरंग दळवी,नितीन मुळे,महादेव उंबरे,राहुल काशीद,अंगद गटकळ,वैभव हराळ,मधुकर सानप,विशाल काळे , हंसराज कवडे ,धनु लोखंडे,वाघोजी रणबावळे प्रमोद डोरले,महेंद्र शिंदे,नवनाथ सोनवणे ,राजेंद्र बारकुल व संयुक्त कृती समितीचे कर्मचारी उपस्थित होते.