
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थाना गेल्या सहा महिन्यापासूनच्या थकित मानधनासाठी आणि वाढती महागाई लक्षात घेता निराधार मानधन ३००० रुपये एवढी करण्यासाठी. दिनांक ८ नोंव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निराधार जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पेठवडज सर्कल मधील सर्व संजय गांधी निराधार योजना, अपंग योजना, श्रावण बाळ योजना या सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांनी तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी दि. ८/११/२१ रोजी ठिक सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमायचे आहे. तरी सर्व निराधार बंधू व भगणी यांनी या मोर्चात सहभागी होऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे श्री. राहुल साळवे अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समिती नांदेड यांनी सांगितले आहे.