
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
ठाणे जिल्हा.
ठाणे-पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयन शिक्षक महासंघाच्या अंतर्गत ठाणे- पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयन शिक्षक संघटनेच्या *शिक्षक सुसंवाद व सभासद जोडो अभियानाची सुरुवात दि.२७/१०/
२०२१ पासून झाली आहे. सदर अभियानाचा आरंभ ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित व कल्याण तालुक्यातील नामांकित *बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि उल्हासनगर शहरातील नावलौकीक प्राप्त आर.के.टी.महाविद्यालया पासून झाली आहे.
बिर्ला महाविद्यालय युनिटचे जिल्हा प्रतिनिधी व संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.किरण पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले,
सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्यांवर समाधानकारक मार्गदर्शन करुन समस्यांचे निराकरण केले. कार्यालया कडून कोणाताही प्रस्ताव अथवा बिले संबधीत कार्यालयात पाठवण्यासाठी विलंब होणार नसल्याची मा. उपप्राचार्यांनी हमी दिली. युनिट प्रमुख प्रा. अजय काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
आर.के.टी महाविद्यालय जिल्हा प्रतिनिधी व जिल्हा सचिव प्रा. केशव चौधरी यांनी उपस्थिततांचे स्वागत केले.
महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने सर्व शिक्षकांचे नियमित वेतन होऊ शकत नव्हते. त्यामुळे शिक्षक दिवाळी सणाच्या तोंडावर अत्यंत चिंतेत होते. या प्रश्नी मा. प्राचार्यांशी सविस्तर चर्चा करुन त्यांच्या मार्फत संस्थेशी तातडीने संपर्क करुन चर्चा केली. एक महिन्याचे आगाऊ वेतन संस्थेने मंजूर केले. दोन दिवसात प्रत्येकांच्या खात्यावर वेतन जमा करणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.
महाविद्यालयाचे युनिट प्रमुख प्रा.फापाळे यांनी प्राचार्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
सदर दोनही महाविद्यालयातील सभेसाठी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे , सचिव प्रा.केशव चौधरी , सल्लागार प्रा.दत्तात्रय चितळे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश माळी समन्वयक प्रा. शिवाजी जगताप, उपाध्यक्ष प्रा. किरण पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.