दैनिक चालू वार्ता
आटपाडी प्रतिनिधी
दादासो वाक्षे
वाक्षेवाडी:-नुकत्याच पार पडलेल्या आय आय टी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि मानदेशाचा हिरा कामत गावचे सुपुत्र दिग्विजय वसंत सरक हे ओपन मधून 4200 वी रँक आणि ओबीसी मधून 741 वी रँक मिळवून आपल्या यशाचा ठसा अखंड देशभरात उठविला. लॉक डाऊन च्या काळामध्ये त्यांनी खूप अभ्यास करून मनोबल वाढवून या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून आटपाडी तालुक्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केल आहे. जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी यांच्या मार्फत त्याचा सत्कार सोहळा पार पडला. सत्कार सोहळ्याला उपस्थित वाक्षेवाडी गावचे माजी सरपंच आप्पासाहेब वाक्षे, पत्रकार विक्रम वाक्षे तसेच जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी चा शिक्षक स्टाफ, अजित वाक्षे ,आकाश वाक्षे, राजू जावीर ,ज्योतीराम वाक्षे