
दै चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
संयुक्त कृति समिती मुखेड यांच्या वतीने बेमुदत उपोषण चालु आहे
उपोषणा मध्ये प्रमुख मागण्या
१.वार्षिक वेतवाढीचा दर ३% करावा.
२.राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे २८% महागाई भत्ता देण्यात यावा.
३.राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे घरभाडे भत्ता देण्यात यावा.
४.दिवाळी पुर्वी सर्व कर्मचाऱ्याना १५ हजार बोनस देण्यात यावा.
५.सण उत्सव भता १२५०० दिवाळीपुर्वी देण्यात यावा एस टी महामंडाळास शासनात विलिन करावे
इतर प्रमुख मागण्यासाठी सर्व कर्मचारी ही एक मागणी जोपर्यत पूर्ण होऊन एस टी महामंडळ शासनास विलिनिकरण होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नाही व आजिबात तडजोड करण्यात येणार नाही
एस टि कर्मचाऱ्याना योग्य न्याय हा मिळालाच पाहिजे रात्र दिवस काम करुन सर्व सण व महत्वाचे कामे बाजुला ठेऊन ड्युटी करतात त्यामुळे एस टी कर्मचार्याचे मागण्या मंजुर झाल्या पाहिजे
या उपोषणास व्ही एस चव्हाण, आर एस माचनवाड, धनंजय जाधव, नागोराव शेटकर, ए वाय गायकवाड, आर जी राचमाळे,गोरडवड, वाय आर सोनकांबळे,संतोष कांबळे, संदीप मोतेवार, ज्ञानेश्वर शिंदे, सुधीर सरकाळे,मारोती घाटे,सर्व मुखेड आगार कर्मचारी मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते