
दै चालु वार्ता वृत्तसेवा
भरत पाटील पवार / कार्यकारी उप संपादक
लोहा- सायाळ ते शेवडी (बा.) रस्त्यावरुन 25 ते 30 गावांची वाहतुक व दळणवळन धाराशिव सहकारी साखर कारखान्याच्या अलीकडे दोन्हीकडुनही डांबर रस्त्याचे काम करण्यात आले आसुन फक्त 500 मिटर रस्त्याचे काम अज्ञानातुन एका शेतक-याने अडविला आसुन सदरचा रस्ता खुला करुन देण्यात यावा यासाठी सायाळचे गावकरी मंडळींनी व धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर यांनि तहसिल कार्यालय लोहा येथे तक्रारी अर्ज दीला असता तत्कालीन तहसिलदार श्री.विठल परळीकर यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांची सुनावनी घेउन सदरचा रस्ता खुला करण्यासाठी दि.03/11/2020 रोजी लेखी आदेश काढला आहे .तेंव्हा तत्कालीन प्रभारी तहसिलदार श्री.बोरगावकर यांनी सदरील रस्त्याचे 500 मिटरवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्याच्या तयारीत असताना व शासकीय यंत्रणेला कामाला लावण्याची तयारी करीत असताना लोहा तहसिलदार पदी श्री.व्यंकटेश मुंडे हे नव्याने विरजमान झाले व लोहा तालुक्याचे सुत्र त्यांच्याकडे आले तेंव्हा सदर कामासाठी तत्कालीन तहसिलदार श्री.परळीकर यांनी काढलेल्या लेखी आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी व रस्ता खुला करुन देण्यात यावा अशी शिष्टमंडळाने मागणी केली असता तहसिलदार श्री.मुंडे यांनी लोकांना सार्वजनिक रस्ता खुला करुन देणे माझे काम नाही.असे उतर देऊन उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग (दक्षिण) नांदेड यांचे काम आहे रस्ता खुला करुन देण्याचे असे सांगुन त्यांना लेखी पत्र काढण्याचा सोपस्कार केला परंतु अद्याप सा.बां.उपविभागाला सदर प्रकरणात काय कार्यवाही केली याची साधी विचारपुस देखील केली नाही तेंव्हा तहसिल प्रशासन व सा.बां.प्रशासन 25 ते 30 गावच्या गावक-यांना वेठीस धरीत आहेत हे आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीच्या लक्षात आले म्हणुन सदरचा रस्ता वाहतुकीला तात्काळ खुला करुन देण्यात यावा या मागणीसाठी आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह आझाद मैदान मुंबई येथे दि.10/11/2021 रोजी पासुन बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार आहे.असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री.सिताराम कुंठे यांना देण्यात आले आहे.अशी माहीती प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी दीली.