
दैनिक चालू वार्ता
पालघर प्रतिनिधी
अमोल टोपले
आदिवासी डीएड, बीएड कृती समिती आक्रमक, सीईओना बांगड्या पाठवून केले अनोखे आंदोलन
शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केला उपोषणकर्त्यांशी फोनद्वारे सम्पर्क
दि.29 ऑक्टो, पालघर- आदिवासी डीएड,बीएड चे विद्यार्थी यांनी २६ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण व साखळी उपोषण चालू केले आहे.
आठ सदस्य बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.सर्वांनी शासकीय आरोग्य यंत्रणेची उपचार घेण्यास नकार दिला आहे.तर बाकी उर्वरित सदस्य साखळी उपोषणाला बसले आहेत.
यात आज साखळी उपोषण कर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालय समोर *बांगड्या भरो आंदोलन* करत प्रशासनाला तात्काळ शिक्षक भरती करण्याचा इशारा दिला. कालच मुंडन आंदोलन वेळी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी उलट सुलट उत्तरे दिल्यामुळे उपोषणकर्ते आक्रमक झाले होते.
आज शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी उपोषण कर्त्यांशी फोनद्वारे सम्पर्क केला असून दिवाळी नंतर शालेय विभागाची मंजुरी देतो आपण उपोषण स्थगित करावे अशी ग्वाही दिली.खासदार राजेंद्र गावित यांनी भेट घेऊन उपोषण कर्त्यांची व्यथा मांडली.पण मागेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे शालेय शिक्षण व वित्त विभागाची मंजुरी मिळाली नाही.आमची फसवणूक झाली म्हणून जो न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषणकर्ते ठाम आहेत.
बांगड्या भरो आंदोलन वेळी निवेदन उपशिक्षणाधिकारी जनाठे यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी मोठ्या संख्येने उपोषणकर्ते सामील झाले होते.
आजचा चौथा दिवस सम्पला पण अजूनही निर्णय झालेला दिसत नाही.म्हणून निवेदनात दि. १ नोव्हेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणकर्ते उपोषण करतील आणि साखळी उपोषण कर्ते,उपोषण कर्त्यांचं आई वडील तसेच उपोषणास पाठिंबा देणाऱ्या विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,सामाजिक कार्यकर्ते ह्या लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहे.हा लॉंग मार्च पालघर ते मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार आहे.असे समितीच्या उपाध्यक्षा गीतांजली पानतले यांनी कळविले आहे.
“शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.दिवाळी नंतर मंजुरी देते असे कळविले आहे पण मग वित्त विभागाच्या मंजुरीसाठी आम्ही पुन्हा आंदोलने करायची का? पवित्र पोर्टल व अभियोग्यता परीक्षेचा काय निर्णय झाला हे कळले नाही.त्यामुळे दोन्ही मंजुरी मिळे पर्यन्त हे उपोषण चालू राहील व येत्या १ नोव्हेंबर पासून लॉंग मार्च निघेल.”
दामू मौळे, अध्यक्ष
आदिवासी डी.टी.एड,बी.एड कृती समिती
“पालघर जिल्ह्यातील शिक्षक भरती व्हावी यासाठी आयुक्त विशाल सोळंकी यांनी अपर मुख्य सचिव यांना भरती करण्यास अनुकूल असा अहवाल दिला आहे.
विवेक कुरकुटे, सल्लागार