
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
वृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बॅकेत त्यांचे खाते आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोर रकान्यात करणे आवश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्या अक्षरनिहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत करावी असे आवाहन कोषागार अधिकारी श्री. अभय चौधरी यांनी केले आहे. याच बरोबर बायोमेट्रिक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत
सादर करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी किंवा अंगठा उमटवलेला नसेल तसेच जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर २०२१ चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.