
दै चालु वार्ता
प्रतिनिधी:अरुण भोई दौंड
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग उदासीन आहे शिक्षकांची बदली, पदोन्नती, त्यांची वैद्यकीय बीले, भविष्य निर्वाह निधी, अनुशेष भरती, उशिरा होणारा पगार या व इतर बाबतीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तात्काळ व योग्य असा न्याय व निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ आंदोलन करेल असा इशारा महासंघाचे राजाध्यक्ष गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.सहविचार सभेच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या देण्यात आल्या .
यासंदर्भात महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर ,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . लोहार ,मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार , जिल्हा आरोग्य अधिकारी शितल कुमार जाधव यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन शिक्षकांच्या डीसीपीएस, एनपीएसच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर चर्चा झाली. बदली होऊन इतर जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांचे डीसीपीएस कपातीबाबत आढावा घेण्यात आला. शिक्षकांच्या वैद्यकीय बिले, भविष्य निर्वाह निधीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालार्थ वेतन प्रणाली सध्या खाजगी शिक्षकांचेमार्फत करण्यात येते व मोठ्या प्रमाणात रकमा गोळा केल्या जातात. त्याऐवजी मुख्याध्यापकांना डायटमार्फत प्रशिक्षण दिल्यास मोठी बचत होणार असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.२००८मधील मागासवर्गीय अनुशेष भरती अंतर्गत भरण्यात आलेल्या रिक्त पदाची माहिती देण्यात यावी . दिगंबर काळे यांच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या निलंबनाची चर्चा करूनपुढील निर्णय घेण्यात आला . शितल काळे( इंग्लिश स्कूल वेळापूर) यांच्या प्रलंबित वेतण्याची या बैठकीत चर्चा करण्यात आली . शिक्षकांचा पगार हा दर महिन्याचे एक तारखेलाच व्हावा असा आग्रह महासंघाच्यावतीने या बैठकीत धरण्यात आला. याशिवाय वर्ग ४ वर्ग,३,वर्ग२,वर्ग१.या क्रमाने कर्मचारी अधिकारी यांचे पगार करण्याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी महासंघाच्या वतीने या वेळी करण्यात आली
या पत्रकार परिषदेला राज्यमहासचिव विठ्ठल सावंत, राज्य सल्लागार दिगंबर काळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णा काळेल उपाध्यक्ष विठोबा गाडेकर कार्याध्यक्ष शंकर लोणकर महासचिव आनंद बनसोडे ,शितल काळे ,बाळासाहेब भिसे,सिद्धेश्वर नारनवर ,गोरख दिवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते .