दिवाळी फक्त गहू तांदळावर साजरी करण्याची वेळ
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मंनधरणे
देगलूर : तालुक्यातील गेल्या काही वर्षापर्यंत शासनाकडून रेशन हरभरा, डाळ, साखर, पाम तेल दिले जायचे. यामुळे अनेक गोरगरिबांची दिवाळी गोड व्हायची; पण आता शासनाकडून केवळ गहू आणि तांदूळ दिले जातो. गेल्या एक दोन महिन्यापासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना मोफत गहू तांदळा बरोबरच एक किलो साखर देखील दिली जात आहे. सध्या रेशनिंग दुकानातून डाळ, साखर, पाम तेल गायब झाल्याने गोरगरिबांची दिवाळी गोड कशी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवाळी सन झाला की श्रीमंत आतापासून गरीब सर्वांनाच गोड-धोड आणि खरीदीचे वेध लागतात; पण दिवाळी काही दिवसानंतर आली असताना रेशन दुकानातून डाळ गायब झाली असून साखर देखील फक्त अंत्योदया लाभार्थ्यांनाच दिली जात आहे.
सध्या रेशन वर कोणाला काय मिळतेय?
१) अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सध्या 25 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 1 किलो साखर मोफत दिली जाते,
२) प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना कुटुंबातील प्रतिव्यक्ती मागे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाते,
३) एपीएल (केशरी) रेशन कार्डधारकांना नियमित धान्य वाटप केले जात नाही; पण शासनाकडून आलेले धान्य वाटप करा तरच धान्य वाटप केले जाते.
दिवाळी साजरी करायची कशी?
शासनाकडून रेशनिंग वर हरभरा डाळ, साखर, पामतेल दिली जात होते; पण आता हे सर्व बंद झाल्याने गोरगरिबांनी दिवाळी कशी साजरी करायची, किमान दिवाळीत हरभरा डाळ, साखर, पाम तेल पुन्हा सुरू करा, दिवाळी तोंडावर आली; पण रेशनवर साखर, हरभरा डाळ काही आली नाही. ती वेळेवर मिळाली, तर आमची दिवाळी गोड होईल.- गृहिणी
शासनाकडून अध्यापक गहू-तांदूळ सोडून दुसरे काहीच नाही शासनाकडून रेशनिंग वर वाटप करण्यासाठी सध्या केवळ गहू आणि तांदूळ आले आहेत. शासनाकडून मिळेल ते धान्य आदेशानुसार वाटप केले जाते. गेल्या एक दोन महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकांना एक किलो साखर वाटप केली जाते. दिवाळीसाठी डाळ व अन्य काही आल्यास वाटप केले जाईल.