
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
ग्रामीण भागातल्या जनसामान्यांचं जगणं, त्यांच्या अडी अडचणी आणि त्यातून घडणारे विनोद यावर प्रकाश टाकून ‘वळण-The Turn’ या वेबसीरीजची निर्मीती झाली आहे…निखळ मनोरंजनाबरोबरच अनेक नवनवीन सामाजिक विषयांवरही या सिरीजच्या माध्यमांतून प्रकाश टाकला गेला आहे…ग्रामीण बोलीभाषेतले विनोदी डायलॉग,विनोदी शायरी आणि विनोदी पात्र यांच्यामुळे हि वेबसीरीज अल्पावधीतच खुप प्रसिद्धी प्राप्त करेन.असं मत प्रोडक्शन टीमनं व्यक्त केलं आहे.
हि वेबसीरीज ग्रामीण तरुणांना दिशा देणारी आणि प्रोत्साहित करणारी ठरणार आहे…
या वेबसीरीजचे लेखक/दिग्दर्शक तुकाराम वैद्य हे मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव गावचे रहिवासी आहेत…तसेच वेबसीरीजचे निर्माता गणेश वैद्य हे त्यांचे बंधू आहेत…
या वेबसीरीजच्या निर्मितीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भगवान शिंदे यांनी काम पाहिले आहे.छायाचित्रण ओम लाखे यांनी केले आहे.प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काम मोहन वैद्य यांनी केलं आहे…ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट गणेश खिस्ते,मार्केटिंग मॅनेजमेंट पवन झोल, तसेच प्रिंटींग वर्क योगेश सुर्यवंशी यांनी केलं आहे.
‘वळण-The’ Turn’ या वेबसीरीजचं चित्रीकरण पूर्ण झालं असून एडीटींग चालू आहे…येत्या काही दिवसातच हि वेबसीरीज “IMP ENTERTAINMENT” या युट्युब चॅनलवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल…लवकरच वेबसीरीजची रिलीज डेट जाहीर केली जाईल…तोपर्यंत IMP ENTERTAINMENT या युट्युब चॅनलला SUBSCRIBE करा…
या वेबसीरीजमध्ये महत्वाच्या मुख्य भुमिकेत मोहन वैद्य,गणेश खिस्ते,पवन झोल आणि अर्चना गायकवाड हे कलाकार आहेत.