
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई 30 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट टीमसाठी टी20 वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅच आता महत्त्वाची आहे.टीम इंडिया देखील न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमधील प्लेईंग 11 सह उतरणार आहे. एखादा खेळाडू अनफिट असेल तरच या टीममध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्यालाचा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. गावसकारांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला हार्दिकला पुन्हा संधी का? टीम इंडियाची पुढील लढत न्यूझीलंड विरुद्ध रविवारी दुबईत होणार आहे.भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमनं पहिली मॅच गमावली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मॅचला ‘करो वा मरो’ चं स्वरुप प्राप्त झालं आहे. या मॅचमधील पराभूत टीमचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह उतरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माजी क्रिकेटपटूंनी टीम मॅनेजमेंटला काही बदल सुचवले आहेत. सध्या फॉर्मात नसलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात यावा असा सल्ला दिला आहे. टीम मॅनेजमेंट मात्र आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स टीमचा पॅटर्न या मॅचमध्ये लागू करण्याचे ठरवले आहे. काय आहे CSK पॅटर्न? टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी कॅप्टन असलेल्या सीएसकेच्या टीममध्ये एका पराभवानंतर बदल केला जात नाही.