
दैनिक चालू वार्ता
परमेश्वर वाव्हळ,
पिंपरी शहर प्रतिनिधी
पुणे-पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ६५ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पुणे शहरातील सामाजिक आरोग्य, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना बुद्धभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने न्यूज २४ तासचे उपसंपादक व कोकणचा आवाज साप्ताहिकाचे गणेश कांबळे, पुढारीचे अमोल सहारे, सकाळच्या आरती मिस्त्री, कराटे किक्क बॉक्सिंगचे गिरीश बागुलकोटकर, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत रणसिंग यांच्यासह दिग्गज मान्यवरांना बुद्धभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री मदन कोटुळे उपस्थित होते. ते म्हणाले की समाजातील सर्व स्तरातील मुला-मुलींनी विशेष प्राविण्य मिळवले पाहिजे. त्यामुळे समाजात देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दर्जा प्राप्त होतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अस्मिता कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले, त्या म्हणाल्या की, आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील व देशातील आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी चांगल्या-वाईट बातम्या जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकारिता क्षेत्र करीत असते. म्हणूनच या लोकशाहीत पत्रकारिता हा घटक महत्त्वाचा घटक मानला जातो. या कार्यक्रमास बॉक्सर तनिष्का कांबळे, हॉकीपटू देवांग कांबळे दुर्गामाता संस्थेचे अध्यक्ष मुकेश कोर्बोल्लू, भगीरथ साकाले, रवींद्र नासू, प्रदीप मटेल्लू, बालकिसन गोलेल्लू, गणेश मुतत्य्या, विशाल महाजन सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनावणे, ज्ञानेश्वर कोळेकर यश अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.