
दैनिक चालू वार्ता,
वानोळा प्रतिनिधी
अजय चव्हाण
दि.02 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय वानोळा येथे विधी सेवा समिती माहूर, पंचायत समिती माहूर, व ग्रामपंचायत प्रशासन वानोळा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात वानोळा ग्रामपंचायत प्रशासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम माहूर न्यायालयाचे न्यायाधीश सन्मा.पवन तापडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सपोनि अण्णासाहेब पवार,संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी सपोनी अण्णासाहेब पवार यांनी या वृक्षांना जाळी बसवा,पाणी घाला जेणेकरून मोकाट जनावरे यांचा त्रास होणार नाही अशा सूचना सुद्धा दिल्या,परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सुचनेकडे काना- डोळा करत अद्याप या वृक्षांना जाळी बसविली नाही, पाणी दिले नाही,परिणामी ही वृक्ष मोकाट जनावरांनी खाऊन टाकली, व ही वृक्ष वाळून गेली.
वानोळा ग्रामपंचायती अंतर्गत 6 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांना मानधन दिले जात असताना सुद्धा वृक्ष संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले,
वृक्ष संवर्धन करायचेच नव्हते, तर वृक्षारोपण का केले, की फक्त प्रसिध्दी करायची होती, अशी भावना सर्व सामान्य जनतेत होत आहे.
या पूर्वी सुद्धा वन विभागामार्फत आलेले सर्व वृक्ष ग्रामपंचायत कार्यालय जवळ असणाऱ्या पडक्या इमारतीत फेकून देण्यात आले होते, व तसे वृत प्रकाशित होताच रातोरात ते वृक्ष ट्रॅक्टर मध्ये भरून इतरत्र हलविण्यात आले होते.
शासन वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करत असताना सुद्धा या गोष्टी कडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे,ही शोकांतिका आहे.