
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : कर्नाटकमधील हनूर तालुक्यातील मारो गावात राहणाऱ्या पुनीत यांच्या एका चाहत्याचे निधन झाले आहे. पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकून ३० वर्षांच्या या चाहत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या चाहत्याचे नाव मुनियप्पा असे होते. मुनियप्पा पुनीत यांच्या निधनाचे वृत्त ऐकून रडू लागला. दरम्यान, तो अचानक जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयाच दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे सांगितले. वयाच्या ४६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला.कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याला धक्का बसला आणि त्याचे निधन झाले.