
दै चालु वार्ता
प्रतिनिधी/ किरण गोंड
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (काँग्रेस) आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (भाजप ) अत्यंत प्रतिष्ठेची केलेली देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी या बड्या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली
रवाविरी मतदान झाले. या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता कार्यकर्ते अकडेमोडीत रंगले आहेत. दरम्यान, 2019 मध्ये 61 टक्के मतदान झाले होते. तर आता सुमारे 3 तीन टक्क्यांनी वाढले म्हणजेच 64 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का हे सोमवारी स्पष्ट होईल.
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप या दोन पक्षांत प्रमुख लढत झाली. त्यात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारानेही रंग भरला. वंचितच्या प्रचारामुळे काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या निवडणुकीच्या प्रचारात मोठी फौजच उतरवली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंढे, नवाब मलिक, एच. के. पटेल यासह इम्रान प्रतापगढी, अनिरुद्ध बनकर यांनाही काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार केला आहे. तर अशोक चव्हाण देगलूरमध्येच तळ ठोकून होते.
भारतीय जनता पक्षानेही कोणतीही उणीव ठेवली नाही. दोन्ही विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष, रामदास आठवले, कर्नाटकमधील भागवत खुब्बा, प्रभू चव्हाण आणि निलेश राणे, गोपीचंद पडळकर डॉ आ.तुषार राठोड ( मुखेड- कंधार) या बड्या नेत्यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे काँग्रेस-भाजप प्रचाराच्या सभा चांगल्याच गाजल्या. त्यातच नुकतेच आजारातून बरे झालेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी देखील देगलूरच्या निवडणुकीत उडी घेतली. वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकरची देगलूरला प्रचारसभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.व देगलूर येथील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे हे लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी यांनी वेगवेगळ्या पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे लिंगायत समाजाचे मतदान आहे ते एक जूट न होता विभागले गेले त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची मानली जात आहे यामध्ये मनोहर धोंडे – कांग्रेस, रामदास पाटील -भाजप, शिवा भाऊ नरंगले- वंचित ,बालाजी बंडे- कांग्रेस