
दै चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी बीड ३३ व्या राष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशीप २०२१ या स्पर्धेत बीड येथील प्रीती नवनाथ चव्हाण यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. राजस्थान येथील जयपुर मध्ये २८ आणि २९ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय कराटे चॅम्पीयनशीप स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारतातली 12 राज्य सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषीक जाहीर झाले आहे. सर्वाधिक गोल्ड मेडल घेवून महाराष्ट्र पहिल्या पुरस्काराची मानकरी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप मध्ये प्रथम पारितोषिक विजेती ठरली आहे. यावेळी महाराष्ट्र सचिव व ऑल इंडिया महाराष्ट्र सचिव यांच्यासह टिममधील खेळाडुंना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रीती चव्हाण यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले असुन सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे