
दै.चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथील बंदयांनी बनवलेल्या वस्तूबाबत सामान्य जगतामध्ये
माहिती व्हावी तसेच बंद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच कारागृहाचे ब्रिद वाक्यानुसार सुधारणा
व पुनर्वसन नुसार बंद्यामध्ये परीवर्तन व्हावे, या उद्देशाने दिपावली निमीत्त कारागृह बंदयाव्दारे तयार
करण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री व्हावी या उददेशाने कारागृह विक्री केंद्राचे उद्घाटन
मा.जिल्हाधिकारी श्री.सुनिल चव्हाण सर यांचे शुभहस्ते आज पार पडले.
सदर कार्यक्रमा वेळी कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाचे स्वीय सहाय्यक श्री.संदीप
धसे, तसेच जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत सर, कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती अरुणा मुगूटराव,
कारागृह वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.विलास साबळे, तुरुंग अधिकारी श्री.कैलास काळे, तुरुंग अधिकारी
श्री.रविद्र औताडे, कारागृहाचे निर्देशक श्री करवंदे, श्री.सचिन भडंग, श्री.शिर्के,श्री.वनवे, कारागृह रक्षक
श्री.गौरव वाघ, श्री. काशीनाथ मंत्रे, श्री. प्रकाश पंडीत व इतर कारागृह कर्मचारी व नागरिक उपस्थित
होते.
या प्रसंगी कारागृहात शिक्षाधीन बंदयांनी बनवलेल्या विविध स्वरुपाच्या वस्तू जसे की, (लाकडी
बैलगाडी, पोळपाट, लाकडी झोपाळा,चरखा, दऱ्या, सतरंज्या, चेअरमेट, रंगीबेरंगी टॉवेल,बेडशीट,
कॉटन साडया,लोखंडी चप्पल स्टैंड,) प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या. सर्व कारागृह निर्मीत
वस्तूंचे मा.जिल्हाधिकारी यांनी कौतूक करुन कारागृहातील आतील विभागास भेट दिली.