
दै . चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी :केंद्रे प्रकाश
श्रीपाद नाईक यांच्या हस्ते विलास वामन प्रभू लिखित ‘आदर्श शिक्षक’ पुस्तकाचे प्रकाशन
पणजी :- सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी समाज घडवण्याची ताकद प्राथमिक शिक्षणात आहे. प्राथमिक शाळेत होणारे संस्कार होणारे संस्कार आयुष्यभर टिकतात, असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते श्रीमती विलास वामन प्रभू लिखित ‘आदर्श शिक्षक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
लेखिकेने या पुस्तकातून मांडलेले अनुभव आणि कल्पकता राज्य सरकारने प्रत्येक शाळेत पोहोचवावी, अशी इच्छा श्रीपाद नाईक यांनी प्रदर्शित केली. शिक्षकांनी विशेषतः प्राथमिक शिक्षकांनी आपले अनुभव आणि विविध कल्पना मिळेल त्या माध्यमातून समाजासमोर मांडाव्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ आणि सहज प्राथमिक शिक्षण उपलब्ध करुन देता येईल, असे नाईक म्हणाले.
जबाबदारीप्रती एखादा व्यक्ती समर्पित झाला की, निश्चित समाजपरिवर्तन घडते. शिक्षकांच्या कल्पकतेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आयुष्यात नवे मार्ग चोखाळण्याची प्रेरणा मिळते. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना निसर्गाशी एकरुप करुन ज्ञानदानाचे कार्य लेखिकेने केले असे सांगत श्रीपाद नाईक यांनी श्रीमती विलास वामन प्रभू यांचे कौतुक केले