
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- भारती विद्यापीठ प्रशाला येथे दीपोत्सव कार्यक्रम जव्हार नगर परिषदेच्या नगरसेविका हर्षदा कपिल तामोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या दीपोत्सव कार्यक्रमासाठी नगरसेविका तामोरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि सुबक आकाश कंदील बनवून आपल्या कलेचे दर्शन दिले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सर्व शालेय विद्यार्थ्यां कडून विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून व गरभानाच करून आनंद द्विगुणित करण्यात आला.या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना आणि पाहुण्यांना फराळाचे वाटप करून अतिशय उत्साहाने दीपावलीचा दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.दीपोत्सव कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे,भारती विद्यापीठ प्रशालेचे प्राचार्य व्ही.के.कनुंजे,सहशिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.