दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी कलंबर सर्कल
हनुमंत श्रीरामे
नांदेड जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून येत्या 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत शस्त्र बंदी आणि जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.अशी माहिती नांदेड जिल्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.नांदेड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37/1 व 3 अन्वये नांदेड जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2021 च्या सकाळी 6 वाजल्यापासून 15 नोव्हेंबर2021च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे.त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तीस या आदेशात नमूद असलेल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या परिसरात जमावबंदी घालण्यात आली आहे.हे आदेश शासनाच्या वतीने व जिल्हा दंडाधिकारी यांच्या वतीने काढण्यात आले आहे.