
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हात दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षकांना शासना कडून निधी प्राप्त होऊनही वेतनाबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
दिवाळी सण तोंडावर आलेला असतांना संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांना दिवाळीपूर्वी वेतन व्हावे याकरिता शासनाने वेतन तरतूद प्राप्त करून दिली असतांना केवळ काही कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाई मुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षक वेतना पासून वंचीत राहिले आहेत. असा आरोप कास्ट्राईब शिक्षक संघटनेने केला आहे.
शिक्षकांना शालार्थ वेतन प्रणाली द्वारे वेतन दिले जाते. वेतन प्रक्रियेतील शाळा, तालुका ,जिल्हा स्तरा वरील कर्मचारी ,
अधिकारी यांच्यावर तारखेनुसार जबाबदारी निश्चित करावी व त्यानुसार ज्या स्तरावर वेतना बाबत दिरंगाई केली जाते. त्या घटकांवर कडक कारवाई करावी तसेच अन्य जिल्हा परिषदांनी आपल्या शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी सुरू केलेली सी .एम् .पी प्रणाली सुरू करावी या मागणीचे निवेदन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी रेंगणे यांना
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शहापुर तालुका अध्यक्ष मनोज गोंधळी ,अंबरनाथ गटविकास अधिकारी नारायनसिंग परदेशी यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अंबरनाथ
तालुका अध्यक्ष आनंद सोनकांबळे ,कल्याण गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कल्याण
तालुका अध्यक्ष बापू ढोडरे ,भिवंडी गटविकास अधिकारी डॉ. प्रदिप घोरपडे साहेब यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे भिवंडी
तालुका कोषाध्यक्ष पुरुषोत्तम अमृतवार यांनी सादर केले. तर जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली व निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांनुसार वेतना बाबत जिल्हा परिषद प्रशासनाला कार्यवाही करण्याबाबत आदेशीत करावे अशी विंनती
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन वेतन दिरंगाई बाबत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन संघटना शिष्टमंडळास दिले आहे.
आंदोलन यशस्वी होण्यासाठी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जाधव ,
कोकण अध्यक्ष संतोष गाढे ,कोकण उपाध्यक्ष अशोक गायकवाड ,
जिल्हा संघटन सचिव सतीश भोसले ,
उल्हासनगर मनपा संघटक अशोक कोकाटे,भिवंडी उपाध्यक्ष श्यामकांत नवाळे ,शहापूर सचिव जगदीश गायकवाड, शहापूर उपाध्यक्ष राजेश रोकडे ,गणाचारी सर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच जिल्ह्यातील संघटना सदस्य यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.