
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
श्री स्वामी समर्थ संस्था आणि नित्यानंद बाबा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा चे अध्यक्ष आदरणीय रामुकाका नाईक गणेशपुरी,स्वामी सेवेकरी सौ. विद्या नाईक वसई,भागीरथी प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय श्री. दिनेश भोईर, तसेच भाताने केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विलास शेलार,सायवन शाळेचे मुख्याध्यापक श्री विशे सर आणि सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन कमिटी,
माजी सरपंच,गावातील सन्माननीय व्यक्ती उपस्थितीत होत्या.