दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगाव सातारा – संभाजी गोसावी
पुणे : दै चालु वार्ता वृत्तपत्राचे सातारांचे पत्रकार श्री. पुरीगोसावी यांच्याकडूंन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची सदिच्छा भेट झाली . पिपरी-चिंचवडचे महानगरपालिकेचे निर्वाचित आयुक्त सन्माननींय शेखर सिंह यांचे सोमवारी सायंकाळी सर्व जिल्हास्तरीय उत्कृंष्ट पत्रकार म्हणून परिचित असणारे श्री.संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांची महानगरपालिका दालनामध्ये सदिंच्छा भेट घेत सन्माननींय शेखर साहेबांचे स्वागत केले. यावेळी निर्वाचित आयुक्त शेखर सिंह साहेबांना सातारा जिल्ह्यांची आठवण झाली. शेखर सिंह यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्य अधिकारी म्हणून तर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तेथील कालावधीनंतर त्यांची शूरवीरांचा जिल्हा आणि ऐतिहासिक जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्यांत जिल्हाधिकारी पदी त्यांची राज्य शासनांने नियुक्ती केली. शेखर सिंह यांनी माजी जिल्हाधिकारी श्रीमती. श्वेंता सिंगल यांच्याकडूंन सातारा जिल्ह्यांचा नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर काही कालावधीतच जिल्ह्यांवर कोरोनांचे संकट उभे राहिले होते. मात्र शेखर सिंह साहेबांनी प्रशासनांला हाताशी घेवुन जिल्ह्यांमध्ये कोरोना काळात त्यांनी उत्कृंष्ट काम केले. सातारा जिल्हाधिकारी असताना उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांचा चांगलाच नावलौकिक झाला होता. त्यांनी कोविड काळामध्ये केलेले कामगिरीबद्दल जिल्हावासींना त्यांची कायम नक्की आठवण राहणार त्याचबरोबर त्यांनी सातारा जिल्ह्यांत कोविड काळात काही निर्बंध घालून दिले होते. त्याचे पालनही जिल्हा वासिवायांनी चांगलेच केले त्यामुळे त्यांनाही जिल्ह्यांमध्ये चांगले काम करता आले. राज्यांत सध्या सत्ता बदलताच अनेक जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या यामध्ये सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या बदलीनंतर जवळपास त्यांना महिन्याभरानंतर नव्या सरकारांने तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या तडकाफडकी बदलीनंतर शेखर सिंह यांची पिपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यांत आली. शेखर सिंह हे २००५ मधील आयएएस अधिकारी आहेत त्यांची शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची प्रशासन विभागांमध्ये ओळख आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त पदाचा त्यांनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. यावेळी शिखर सिंह पुढे म्हणाले मला जरा पदभार घेण्यांस उशीर झाला सातारच्या बदलीनंतर मी गावी होतो. तसेच माझी आयुक्त म्हणून ही पहिलीच पोस्टिंग आहे. पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रलंबित कामे यांना मी प्रथम प्रधान्य देईल तसेच शहरांतील विकासाबद्दल माझे प्रधान्य राहील जास्तीत जास्त सर्व विभागांच्या प्रशासनांला हाताशी घेवुन चांगले काम करण्यांचा माझा प्रयत्न राहील मी या अगोदर सातारा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होतो. आणि आता नव्या सरकारने माझी आयुक्त म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली याचा मला आनंद आहे असे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे निर्वाचित आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले यावेळी सातारा जिल्ह्यांचे पत्रकार हे सोमवारी सायंकाळी त्यांच्या दालनामध्ये सदिंच्छा भेट घेताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे निर्वाचित आयुक्त शेखर सिंह यांना सातारा जिल्ह्यांची आठवण झाली. यावेळी श्री. पुरीगोसावी यांनी शेखर सिंह यांचे भव्य स्वागत केले. यावेळी शेखर सिंह यांनी सातारच्या पत्रकारांचे कौतुक करीत स्वागतांचा स्वीकार केला. याविषयी शेखर सिंह पुढे म्हणाले की श्री. पुरीगोसावी हे माझ्या गडचिरोली जिल्ह्यांपासून चांगलेच परिचित आहात गोसावी तुम्ही या ठिकाणी आलात माझे भव्य स्वागत केले याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.