
दै चालु वार्ता वृत्तसेवा
इतिहासामध्ये एक अनोखी नोंद एलन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे, जी इतिहासात नवा विक्रम म्हणून नोंदवली गेली आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती म्हणजे पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पोर्तुगालसारख्या देशांची अर्थव्यवस्था त्याच्या संपत्तीपेक्षा कमी आहे, यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो. एलोन मस्क म्हणजे जगामध्ये जी गोष्ट अशक्य आहे ती शक्य करणारा व्यक्ती ; ज्याला काही होत नाही काही अशक्य आहे यावरती त्याचा विश्वास नाही .
एलन मस्क सध्या यशाच्या शिखरावर स्वार होऊन खूप वेगाने पुढे जात आहेत. ते जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली असून हा एक नवा विक्रम बनला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि पोर्तुगालसारख्या देशांची अर्थव्यवस्था त्याच्या संपत्तीपेक्षा कमी आहे, यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, आज मस्क यांची एकूण संपत्ती ३०२ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच ७५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत त्याच्या संपत्तीत एकूण १३२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अमेझॉनचे जेफ बेझोस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १९९ अब्ज डॉलर आहे. ते एलन मस्कच्या १०३ अब्ज डॉलरने मागे आहेत.
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी या यादीत ११ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९८.४ अब्ज डॉलर आहे. गेल्या २४ तासांत त्याच्या संपत्तीत ७६१ दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. या यादीत गौतम अदानी १४व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ७४.५ अब्ज डॉलर आहे. गेल्या चोवीस तासांत त्यांची संपत्ती ४.६७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
एलन मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे अमेरिकन कार रेंटल कंपनी हर्ट्झने टेस्लाकडून १ लाख कार ऑर्डर केल्या आहेत. यामुळे त्याच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टेस्ला समभागांनी या आठवड्यात आतापर्यंत सुमारे २० टक्के उसळी घेतली आहे. टेस्लामध्ये मस्क यांची हिस्सेदारी २३ टक्क्यांच्या जवळपास आहे. आता सध्याच्या परिस्थितीनुसार इलॉन मस्क ला मागे टाकण्यासाठी स्पर्धेमध्ये अमेझॉन आहे. पण ॲमेझॉनला मस्क संपत्तीचे बरोबरी करण्यासाठी सध्याच्या स्पीड नुसार किमान 5 वर्षे लागतील…… तोपर्यंत मस्क च्यां संपतीची वाढ होईलच….