दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
भीमा सहकारी साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला. कारखान्याला ऊस गाळपासाठी आलेल्या पहिल्या ट्रॅक्टर व बैलगाडीचे पूजन करून कारखान्याच्या ७ ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले.
गतवर्षीच्या १०० टक्के एफआरपी बरोबरच कारखान्याच्या कर्मचार्यांना ८.३३% बोनस देण्यात आला. याशिवाय सभासदांना २५ किलो साखर वाटप करून शेतकरी, सभासद आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. कारखान्याचे कामगार, शेतकरी आणि सर्व सभासदांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व सर्व सभासदांनी ऊस गळीतस देन्यास चेअरमन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले यावेळी युवा नेते विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश आण्णा जगताप, दिलीप रणदिवे व संचालक मंडळ उपस्थित होते..