
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई – सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची हवा आहे.बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी यावेळी विराटच्या बाजुनं प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र चाहत्यांनी विराट आणि त्याच्या टीमवर टीका केली.
गेल्या रविवारी भारताला पाकिस्तान विरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावरुन भारतावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
एवढेच नाही तर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. त्यावरुन भडकलेल्या चाहत्यांना विराटनं सुनावलं होतं. आपण जे काही बोलता आहात ते चूकीचे आहे. आपल्याच संघातील खेळांडूविषयी असं बोलणं चूकीचं आहे. असं त्यानं म्हटलं होतं.भारतानं पाकिस्तान विरोधातील सामना हरल्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यावेळी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपआपल्या प्रतिक्रिया दिली होती.
वेगवेगळ्या मुद्दयांवर आपली प्रतिक्रिया देणाऱ्या स्वराची नेहमीच चर्चा होत असते.
आताही स्वरानं विराटच्या बाजुनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, माझ्या मते विराटनं पहिल्यांदाच चांगलं काही सांगितलं आहे. विराटच्या व्टिटवर तिनं टाळ्या वाजवतानाचा इमोजी शेयर केला आहे. त्यावेळी काही नेटकऱ्यांनी स्वरालाही ट्रोल केले आहे. स्वरा मावशी तर आज क्रिकेटची सपोर्टर झाली आहे. असं त्यांनी लिहिलं आहे.