दै चालु वार्ता /
मुखेड ता.प्रतिनिधी /
संघरक्षित गायकवाड/
नांदेड : – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे साहेब , मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांतदादा कदम यांच्या सूचनेनुसार,तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील कऱ्हाळे , यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस मुखेड विद्यार्थी तालुका अध्यक्ष *अमोल पाटील गोजेगावकर* यांचा नेतृत्वात विद्यार्थ्यांचे लसीकरण करून महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मुखेड येथे तहसीलदार साहेबांना केंद्रातील भाजप सरकार विरोधात निवेदन दिले. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,च्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे
या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष प्रताप पाटील चौधरी, मा. शहरध्यक्ष नागनाथ गायकवाड, राष्ट्रवादी सोशियल मीडिया जिल्हा अध्यक्ष शादूल होनवडजकर, मुखेड महिला तालुका अध्यक्ष पंचफुला बिरादार, युवती तालुका अध्यक्ष पंचवटीताई गोंडाळे, युवक ता. अध्यक्ष रमाकांत पाटील जाहूरकर, युवक विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर, युवक ता. उपाध्यक्ष निशिकांत पाटील हातराळकर, युवक सचिव विकास सोनकांबळे, विद्यार्थी चे ता. उपाध्यक्ष निखिल पाटील येलूरकर, युवक कार्यकर्ते योगेश ननुरे,तातेराव ताळीकोटे,दिपक भद्रे, ज्ञानेश्वर भद्रे,प्रविण साळवे, अक्षय सागरे प्रविण जिल्हेवाड, संदेश जाधव, संदिप तोटरे,राजेश गवाले, अजित उमाटे, संघर्ष गायकवाड, अंकुश लुट्टे,अहमद शेख, ,आणि सर्व सेलचे कार्यकर्ता पदधिकारी उपस्थित होते.