
दै चालु वार्ता वृत्तसेवा
============= लातूर जिल्हा प्रतिनिधी
प्रा.मारोती बुद्रुक पाटील. दैनिक चालू वार्ता.
अहमदपूर पासून जवळच असलेल्या टाकळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीच्या सनानिमित्ते गावातील प्रत्येक घरात दिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची बॅग गावचे उपसरपंच तथा कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक परमेश्वर घोगरे- पाटील यांनी स्वखर्चाने भेट दिल्याने सर्वसामान्य कुटुंबाची आनंदात दिवाळी साजरी होणार आहे.
टाकळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच केरबा कांबळे व उपसरपंच परमेश्वर घोगरे यांनी प्रत्येक घराच्या समोर व रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून वृक्षांचे संगोपन केले आहे.गावातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी व सांडपाणी यांचे योग्य नियोजन केले आहे.
कोवीड लसीकरण जवळपास गावात 90% पुर्ण झाले असून टाकळगावात 100% कोवीड लसीकरण करण्यासाठी आज दिवाळीची भेट वस्तू गावातील 825 घरामध्ये स्वतः सरपंच व उपसरपंच यांनी देऊन पुन्हा लसिकरणाचे अहवान केले आहे.
सरपंच केरबा कांबळे व उपसरपंच तथा कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक परमेश्वर घोगरे यांनी कोवीड लसीकरण बाबत भेट वस्तू देण्याचा अनोखा उपक्रम राबविल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केले होत आहे.
भेट वस्तू कार्यक्रमाच्या वेळी सरपंच केरबा कांबळे, उपसरपंच परमेश्वर घोगरे, माजी सरपंच विनायक दराडे, रंगनाथ पत्की,राम पांचाळ,तुळसिराम घोगरे, माधव घोगरे, गंगाधर तत्तापुरे,एकबाल शेख, साहेब मेहराज,कोरत शेख, कृष्णा घोगरे,शेषेधर घोगरे, रहीम पठाण,नाथराव घोगरे, संतोष घोगरे, बालाजी सोनेवाड,केशव कंरडे़,शरद कंऱडे, धनाजी घोगरे, बालाजी कंरडे,खयूम शेख,नवाज पठाण,याबु शेख, रावसाहेब गायकवाड, विक्रम कांबळे, विशाल जाधव,मकदूम शेख यांच्या सह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.