
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली: कोरोना लसीकरण संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार ; कमी प्रमाणात लसीकरण झालेल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी बैठक करणार आहेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा पण कमी लसीकरण झाले आहे, म्हणजे पहिल्या डोसचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे आणि दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जी २० (G 20) परिषदेवरुन भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेणार आहेत.४० पेक्षा अधिक जिल्हे आहेत. या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसाच्या जी २० परिषदेसाठी रोम मध्ये आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकल यांच्यासोबतही बैठक करणार आहेत.
झारखंड, मनीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील.