
दैनिक चालू वार्ता
परमेश्वर वाव्हळ,
पिंपरी शहर प्रतिनिधी
पुणे-पिंपरी चिंचवड सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष किशन चावरीया यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बैठकीच्या निमित्ताने व सफाई कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निमंत्रित केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात कामगार नेते किशन चावरिया यांनी अनेकदा पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला पत्रे व निवेदने देऊन, सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवत असतात. सफाई कर्मचाऱ्यांना न्याय कसा मिळेल? या दृष्टिकोनातून लोकशाही मार्गाने ते सतत आंदोलने करत असतात. म्हणून त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने माहे ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी मा. आयुक्त राजेश पाटील साहेब यांच्या दालनात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा विनिमय करण्यासाठी कामगार नेते किशन चावरिया यांना या बैठकीदरम्यान निमंत्रित केले आहे. दरम्यान या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांना कोठे ना कोठे? तरी न्याय निश्चित मिळेल, अशी चर्चा सफाई कर्मचाऱ्यांत सुरू आहे. अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी या बैठकीदरम्यान किशन चावरिया यांना शुभेच्छा दिल्या आहेत.