
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधि मोहन आखाडे
जिल्हाधिकारी कार्यालयात वल्लभ भाई पटेल जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदींनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेतली. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती त्यांनीही प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.