
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलुर दिनांक 30 /10 /2021 पासून च्या मध्यरात्रीपासून देगलूर आगारातील सर्व कर्मचारी यांच्या तर्फे शांततेत व सदस्य मार्गाने बेमुदत काम बंद .दिनांक 27 /10 /2021 पासून रा.प. परिवहनाच्या सर्व संघटना कृती समितीने संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू होते तरी राप महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सदर उपोषण तपणे पाठिंबा दिला पण कृती समितीमार्फत कर्मचाऱ्यांचे शासकीय विलीनीकरण करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे राज्यातील एस .टी. कर्मचारी यांनी बेमुदत संप सुरुवात केली आहे व चालू आहे एसटी कर्मचारी त्यांची प्रमुख मागणी रा. प. महामंडळ व सर्व कर्मचारी शासकीय सेवेत सामावून घेणे अशी आहे परंतु देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक व आचारसंहिता असल्यामुळे त्या कालावधीमध्ये देगलूर आगारातील कर्मचारी कोणत्याही उपोषण संप अशा कोणत्याही प्रकारमध्ये सहभागी झाले नाहीत.
तरी दिनांक 30 /10 /2021 च्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी एसटी कर्मचारी संघटना विहित सर्व देगलूर आगारातील कर्मचारी शांततेत व सनदशीर मार्गाने बेमुदत काम बंद पुकारत आहेत तरी त्यांच्या या बंदला .
संघटनेचे तालुका अध्यक्ष इश्वर देशमुख ढोसणीकर ,धनाजी देशमुख करडखेड सर्कल प्रमुख ,कर्मचारी संघटना मराठा महासंग देगलूर तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील हिवराळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.