
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ईयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फार्म नं. १७ भरुन प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. या सुविधेनूसार विद्यार्थी २२ नोव्हेंबर पासून नाव नोंदणी अर्ज आणि शुल्क आॅनलाईन भरु शकतील. तर २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत विद्यार्थ्यांना मुळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्या बाबत पोचपावती दोन प्रतीत छायाप्रति व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. ईयत्ता दहावीसाठी http://Form.17.mh.ssc.ac.in तर ईयत्ता बारावी साठी http ://form.17.mh.hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाची आहेत. दि. ११ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी साठी प्राप्त अर्जातील दुरूस्ती करण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याकरीता १) शाळा सोडल्याचा दाखला. २) आधार कार्ड ३) पासपोर्ट फोटो ४) विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अनिवार्य असणाऱ आहे. ईयत्ता दहावी साठी १००० हजार रुपये नोंदणी शुल्क १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर ईयत्ता बारावी साठी ५०० रूपये नोंदणी शुल्क तर १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरीत्या प्रविष्ट व्हायचे असेल तर दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी. अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८ यावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.